बुधवार, जुलै ३

शिवाबावनीतील हिंदू धर्मरक्षक शिवराय !!

देवल गीरावते फिरवते निसान आली ऐसे डूबे राव राने सबी गाते लबकी !
गौरा गणपती आप औरनको देत ताप आपनी ही बार सब मारि गये दबकी !
पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धकी सिद्धाई  गई रही बात रबकी !
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जीत होती, सिवाजी न होते तो सुनति होती सबकी !!१९!!

अर्थ - मुसलमानांकडून देवळे पाडली जात आहेत. मंदिरे उध्वस्त केली जात आहेत व त्यावर अलीचे झेंडे प्रस्थापित केले जात आहेत. अशावेळी सर्व रावराणे निर्बल व पराभूत झाले आहेत. गौरी गणपती सारख्या देवता भक्तांनी आपली उपासना केली नाही म्हणून त्यांना त्रास देतात पण त्यांच्यावर वेळ येताच त्यासुद्धा लपून बसल्या आहेत. हिंदू जनतेला तर पीर-पैगंबरामध्येच दिगंबर-दत्त दिसू लागले आहेतसाधू व सिद्धांच्या रिद्धी-सिद्धी गेल्या फक्त रबचीच चर्चा सुरु झाली. अशावेळी जर शिवाजी महाराजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथुरेत मस्जिद झाल्या असत्या व आपल्या सर्वांचीच सुंता झाली असती.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

सौंच को न मानै देवी देवता न जानै अरु ऐसी उर आनै मै कहत बात जबकी !
और पातसाहन के हुती चाह हिंन्दुन कि, अक्कबर साहजहॉँ  कहै साखि तब कि !
बब्बर के तब्बर हुमायु हद्द बौंधी गये दोनो एक करी न कुरान बेद ढब कि !
कासी हुकी कला जाती मथुरा मस्जीत होती, सिवाजी न होते तो सुनति होती सबकी !!२०!!
अर्थ - कवी भूषण म्हणतात, लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळी अन्य मुसलमानी बादशाह राज्ये करीत होती त्यावेळी त्यांना हिंन्दुंवीषयी थोडी सहानुभूती तर होती याची साक्ष अकबर व शहाजहान होते. बाबरचा मुलगा हुमायून यानेदेखिल हिन्दूंची धर्म मर्यादा सांभाळली. कुराण आणि वेद यांची भिन्न असलेली तत्वे एक केली नाहीत. हा औरंगजेब पहा. त्याला सत्याची चाड राहिली नाही. अशावेळी जर शिवाजी महाराजांचा अवतार झाला नसता तर काशीची कळा गेली असती, मथुरेत मस्जिद झाल्या असत्या व आपल्या सर्वांचीच सुंता झाली असती.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

कुंभकन्न असुर औतारी अवरंगजेब कीन्ही कत्ल मथुरा दोहाई फेरी रब की !
खोदि डारे देवी देव सहर महल्ला बौके, लाखन तुरुक कीन्हे छुटि गई तब की !
भूषन भनत भाग्यो कासिपती विश्वनाथ, और कौन गिनती मे भुली गती भब कि !
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि, सिवाजी न होते तो सुनति होती सबकी !!२१!!

अर्थ - कुंभकर्ण राक्षसाचा अवतार जो औरंगजेब त्याने मथुरेत अनेक हिन्दूंची कत्तल करून सर्व शहरांत इस्लामी रबची द्वाही फिरविली. शहरांतील गल्लोगल्लीतून असलेल्या उत्तम उत्तम देव देवता देवालये खणून काढली. लाखो हिन्दुना मुसलमान केले. इतकेच काय काशीपती विश्वनाथ भयभीत होऊन पळाले, महादेवाची तर इतकी त्रेधा उडाली कि इतरांची कथा काय? अशावेळी जर शिवाजी महाराजांचा अवतार झाला नसता तर हिंदूंच्या चारी वर्णांना आपली धर्मकर्तव्ये सोडून नमाज पढावे लागले असते, व आपल्या सर्वांचीच सुंता झाली असती.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


उतै पात साहजु के गजन के ठ्ट्ट छुटे, उमडि घुमडि मतवारे घन कारे हैं !
इतै सिवराज जु के छुटे सिंहराज और बिदारे कुंभ करिन के चिक्करत भारे हैं !
फौजें सेख सैय्यद मुगल औ पठानन की मिली इखलास खॉं हु मीरन सॅंभारे हैं !
हद्द हिन्दुवान की बिहद्द तरवारि राखी, कैयो बार दिल्ली के गुमान झारि डारे हैं !!२४!!

अर्थ तिकडुन दिल्लीपती औरंगजेब बादशहाच्या हत्तींच्या  झुंडी च्या झुंडी काळ्या कुट्ट मेघांप्रमाणे निघाल्या आहेत., तर इकडे शिवाजीराजांचे सिंहासारखे मराठे शुर गडी घोर गर्जना करीत त्या हत्तींच्या मस्तकांचे तुकडे करित आहेत. शेख, सय्यद, मोगल, पठाण यांचे सैन्य इखलासखान सारखा शुर सरदारसुद्धा सांभाळु शकेना. शिवाजी राजाने आपल्या तरवारीच्या जोरावर कित्येकवेळा दिल्लीवाल्यांची घंमेंड जिरवुन हिंदुत्वाची मर्यादा राखली.
संदर्भशिवाबवणी.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
गरुड का दावा सदा नाग के समुह पर, दावा नाग जूह पर सिंह सिरताज को !
दावा पुरहूत को पहारन के कुलपर, पच्छिन के गोल पर दावा सदा बाज को !
भूषन अखंड नवखंड महि मंडल में, तम पर दावा रवि किरन समाज को !
पूरब पछॉंह देश दच्छिन ते उत्तर लौ, जहॉ पातसाही तहॉ दावा सिवराज को !!३४!!

अर्थ गरुडाचा अधिकार जसा सर्पांच्या समुहावर, शुर सिंहांचा दावा ज्याप्रमाणे हत्तींच्या कळपांवर, इंद्रांचा पर्वतरांगांवर, बहिरी ससाण्याचा पक्षिगणावर, सुर्यकिरणांचा ताबा ज्याप्रमाणे नवखंड पृथ्वीवरील अंधकारावर अखंडपणे चालतो तद्वतच पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासुन उत्तरेपर्यंत देशात जेथे मुसलमानी बादशाही तेथे तेथे शिवाजीराजांचा अधिकार चालु झाला.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दुग्ग पर दुग्ग जीते सरजा सिवाजी गाजी, उग्ग नाचे उग्ग पर रुंड मुंड फरके !
भुषन भनत बाजें जीत के नगारे भारे, सारे करनाटी भूप सिंहल को सरके !
मारे सुनि सुभट पनारे बारे उदभट, तारे लागे फिरन सितारे गढ्धर के !
बीजपुर बीरनके गोलकुंडा धीरन के, दिल्ली उर मीरन के दाडिम से दर के !!४४!!

अर्थ धर्मवीर शिवाजींनी  एकामागुन एक असे कित्येक दुर्गम दुर्ग जिंकुन घेतले. रणांगणात शेकडो धडे व शिरे नाचुं उडुं लागली. विजयदुदुंभीच्या  प्रचंड जयघोषाने कर्नाटकचे सर्व राजे थेट सिंहद्विपापर्यंत (श्रीलंका) पळाले. शिवसुर्य अनुकुल तळपत आहेसे पाहुन व पन्हाळगडच्या शुर वीर योद्ध्यांस मारलेले ऐकुन विजापुरच्या वीरांची, गोवळकोंडा येथील धैर्यशील शुरांची व दिल्लीच्या सरदारांची हृदये डाळींबाप्रमाणे उकलली.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


मालवा उजैन भनि भूषन भेलास ऐन सहर सिरोज लौं परावने परत हैं !
गोंडबानो तिलंगानो फिरंगानो करनाट रुहिलानो रुहिलन हिये हहरत है !
साहिके सपूत सिवराज, तेरी धाक सुन गढपती बीर तेऊ धीर न धरत है !
बीजापूर गोलकुंडा आगरा दिल्ली के कोट बाजे रोज दरबाजे उघरत है !!४५!

अर्थ – हे शहाजीचे सुपुत्र शिवराज! तुमच्या धाकाने माळव, उज्जैन आणि भेलसा येथील मुसलमान रहिवाशांस थेट इराणची राजधानी शिराजपर्यंत पळावे लागले. गोंडवण, तेलंगन, रोहिलखंड, कर्नाटक तसेच फीरंगी लोकांच्या वस्तींतील लोकांच्या ह्र्दयात धडकी भरली आहे. मोठमोठे शूर किल्लेदार धीर धरुन तरवार धरीनातसे झाले. गोवळकोंडा, आग्रा आणि दिल्ली येथील किल्ल्यांचे दरवाजे द्रररोजच्या ऐवजी केव्हातरी उघडतात.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

डाढीके रखैयनकी डाढीसी रहत छाती बाढी मरजाद जैसी हद्द हिन्दुवाने की !
कढीगई रैयत के मनकी कसक सब, मिटिगई ठसक तमाम तुरकाने की !
भूषन भनत दिल्लीपति दिल धकधका सुनि सुनि धाक सिवराज मरदाने की !
मोठी भई चंडी बिन चोटी के चबाय सीस, खोटी भई संपत्ति चकता के घराने की !!४७!!

अर्थ – जसजशी हिन्दुंची राज्यमर्यादा वाढुं लागली, तसतशी दाढी राखणा-यांची छाती जळु लागली. हिन्दुंचे वैभव सहन होईना, हिन्दु प्रजेच्या मनांतील सर्व पीडा नाहीश्या झाल्या व सर्व मुसलमानांचा गर्व पार नष्ट झाला. भुषन म्हणतो मर्द शिवरायांचा दरारा वारंवार ऐकुन दिल्लीपती औरंगजेबाच्या ह्रदयांत धडकी भरली. रणदेवता शिखाहीना

अपूर्ण.